केंद्र सरकारने लागू केलेले दहा टक्के आरक्षण नेमके कुणासाठी ? : शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : केंद्र सरकारने लागू केलेले दहा टक्के आरक्षण नेमके कुणासाठी? असा सवाल माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला आज सकाळी कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत केला. नुकतेच सवर्णाँना दहा टक्के आरक्षण केंद्र सरकारने लागू केले आहे. या आरक्षणावरुन देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. कुणी याचं समर्थन करत आहे तर कुणी विरोध. मात्र पहिल्यांदाचा शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया आज दिली.

ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारने दिलेले आरक्षण कोर्टात टिकणार का? मात्र 50 टक्क्यांच्या पुढे आरक्षण नको, ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाही. आरक्षण टिकण्यासाठी सरकारने घटनादुरुस्ती केली आहे. तरीही आरक्षण कोर्टात टिकण्याची शक्यता कमी आहे.

You might also like
Comments
Loading...