तब्बल ८ वर्षांपासून बनावट नोटांची निर्मिती

सोलापूर- प्रिंटर मशीनच्या साहाय्याने घरात बनावट तयार करताना जियाऊद्दीन अमीनसाब दुरूगकर (वय ६०, रा. शुक्रवार पेठ) याला अटक झाली.प्रिंटर, कटिंग मशीन, नोटा प्रिंटर करण्याचे कागद व प्रिंट केलेले १८ लाख चाळीस हजार रुपये जप्त केले अाहेत. त्यात दोन हजार, पाचशे व शंभर रुपयांच्या नोटांचा समावेश अाहे. एकाच सिरीजच्या या नोटा अाहेत. ही कारवाई गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

अाठ-दहा वर्षांपासून हे काम दुरूगकर करीत असल्याचे समोर येतेय. काही ग्राहक हेरून एक लाख रुपये दिल्यास तीन लाखांच्या बनावट नोटा मिळतील असे अामिष तो दाखवत होता. दोघांमधील व्यवहार झाल्यानंतर बनावट नोटाही त्यांना न देता पोलिस अाले, छापा पडला असे सांगून पळून जात. तसेच अगोदर चलनातील नोटा घेत असत. यामुळे हे प्रकरण अातापर्यंत समोर अाले नाही.

मूळचा सोलापूरचा पत्नी, चार मुली व एका मुलासमवेत राहतो. तीन मुलींचे विवाह झाले अाहेत. बारा ते चौदा वर्षापूर्वी तो मुंबई मंत्रालयात कंत्राटी पध्दतीने कामगार होता. तिथली नोकरी गेल्यानंतर सोलापुरात येताना मुंबईहून प्रिंटर मशीन अाणले. उपजिवीकेचे साधन म्हणून कलर प्रिंटरने बनावट नोटा तयार करण्याचे काम सुरू केले. काही काळ सायबर कॅफेही चालविले. चौकशीतून आणखी माहिती बाहेर येईल, असे फौजदार भीमसेन जाधव यांनी सांगितले