गेल्या ४ ते ५ वर्षांपासून… नवाजुद्दीनच्या पत्नीने केले गंभीर आरोप!

Nawazuddin siddiqui

मुंबई : बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया हिनं आता तलाक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिनं नवाजला व्हॉट्स अॅप आणि ईमेलच्या माध्यमातून नोटीस पाठवली आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक घटस्फोट याआधीही समोर आले आहेत ज्यामुळं सर्वजण चकित झाले आहेत.

या नोटीसीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आलिया सिद्दिकी अर्थात नवाजुद्दीनच्या पत्नीने त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप लावले आहेत. आता मी घाबरणार नसून, स्पष्टपणे सगळ्या गोष्टी जाहीर करणार असल्याचे तिने म्हंटले आहे.

प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनच्या पत्नीने दीर आणि सासरच्यांकडून मारहाण होत असल्याचा आरोप केला आहे. तर गेल्या ४ ते ५ वर्षांपासून नवाजुद्दीन आणि ती वेगेळे राहत असल्याचा गौफ्यस्फोटही तिने केला.

पुढे बोलताना ती म्हणाली, ती मुलांसह वेगळी राहत असून, तो शेवटचा मुलांना भेटायला कधी आला होता हे देखील आठवत नसल्याचे म्हणत तिने आपले दुःख व्यक्त केले. खूप सहन केले आता बस झाले म्हणत तिने घटस्फोटानंतर दोन्ही मुलांची कस्टडी आपल्याला देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

सोनाली कुलकर्णीने चाहत्यांना दिलं गोड सरप्राईज, साखरपुड्याचे फोटो केले शेअर

काय सांगता ? घरात राहून आर्ची करतेय चक्क ‘हे’ काम…

​‘गली बॉय’च्या सेटवरचे आलिया भट्ट व रणवीर सिंगचे फोटो लिक!