रुग्णालयाच्या इतिहासात पहिल्यांदा मिळाला एवढा सम्मान, कर्मचाऱ्यांनी केले मनोगत व्यक्त

औरंगाबाद : खा. जलील यांनी घाटी रुग्णालयाला तीन रुग्णवाहिका भेट दिल्या.
त्याचा लोकार्पण सोहळा नर्स, वार्डबॉय व सुरक्षा रक्षकांकडून सोमवारी करण्यात आला. यावेळी त्यांनी कर्तव्यात असताना पहिल्यांदा असा सन्मान मिळाल्याचे उपस्थितांना सांगितले. यावेळी खा. इम्तियाज जलील यांच्यासह अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. वर्षा कागीनाळकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुधिर चौधरी, डॉ. कैलास झिने व डॉ. सुरेश हरबडे यांची उपस्थिती होती.

खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्यामुळे आज ३५ वर्षात पहिल्यांदाच पडद्यामागे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना एवढा सम्मान मिळाल्याचे उद्घाटन करणारे नर्स, वार्डबॉय व सुरक्षा रक्षकांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले. आजपर्यंत घाटी परिसरात हजारो कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमात मोठ्या लोकांना माहिती देणे, सोयी सुविधा देणे आणि सुरक्षा पुरविण्यातच वयाचे एवढी वर्ष खर्च झाली. परंतु पहिल्यांदाच आज आम्हाला मुख्य अतिथी म्हणुन बोलविण्यात आले आणि आमच्या हातुन रुग्णवाहिकांचे उद्घटान करण्यात आल्याने उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी खासदार इम्तियाज जलील यांचे आभार मानले.

खासदार इम्तियाज जलील यांच्या समोर भावुक होवुन त्यांनी विविध प्रसंग सांगितले. जेव्हा एखादा रुग्ण पुर्णपणे बरा होतो. तेव्हा त्याला निरोप देतांना जे आनंदाश्रु निघतात ते हे दर्शवितात की, याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांची सेवा करतांना खऱ्या अर्थाने आई-वडिलांची भुमिका घेवुन रुग्ण सेवा केल्यामुळेच आम्ही बरे होवुन आमच्या घरी चाललो ही उत्कट भावना जेव्हा त्यांचा मनात निर्माण होते तेव्हा त्या सर्व भावना आश्रुरुपाने प्रकट होतात. असे अनेक प्रसंग निर्माण झाल्याचे या कर्मचाऱ्यांनी खासदार इम्तियाज जलील यांना सांगितले. व ते म्हणाले की, आता या रुग्णवाहिकेमुळे आमच्या या कार्यास अधिक बळकटी मिळुन रुग्ण वाचण्याचे टक्केवारी हमखास वाढणार होणारच असुन गोरगरीबांना या संकटकाळी मोठी मदत होणार आहे. असे मनोगत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.

महत्त्वाच्या बातम्या