fbpx

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधकांच्या निषेधार्थ सत्ताधारी बसणार उपोषणाला

mp anil shirole

पुणे: देशाच्या इतिहासात प्रथमच केंद्रातील सत्ताधारी हे विरोधकांच्या निषेधार्थ उपोषणाला बसणार आहेत, याला कारण आहे ते बारगळलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन. विरोधकांनी गोंधळ घातल्यानेच अधिवेशनाचे कामकाज होऊ शकले नसल्याचा आरोप सत्ताधारी भाजपकडून करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधकांचा निषेध म्हणून १२ एप्रिल रोजी देशभरातील भाजप खासदार त्यांच्या मतदारसंघात लाक्षणिक उपोषण करणार आहेत. पुण्यामध्ये देखील खासदार अनिल शिरोळे हे बालगंधर्व मंदिर चौकामध्ये उपोषण करणार आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेचे कामकाज केवळ ४३ तास तर राज्यसभेकचं ४५ तास होऊ शकले. म्हणजेच दोन्ही सभागृहाचे २४८ तास वाया गेले आहेत. विरोधी पक्षांनी घेतलेल्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळेच कामकाज होऊ शकले नसल्याचा आरोप सत्ताधारी भाजपकडून करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचा निषेध करण्यासाठी देशभरात हे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्यासमवेत पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापौर मुक्ता टिळक तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते लाक्षणिक उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती खा. शिरोळे यांनी दिली.

2 Comments

Click here to post a comment