मुंबई : कोरोना महामारीनंतर जवळपास दोन वर्षानंतर वारकऱ्यांची वारी सुरू झालेली आहे. अनेक भक्त या वारीमध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. यामध्ये मराठी कलाकारांचा देखील समावेश असल्याचे दिसत आहे. आता यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशी ही वारीत सहभागी झाली आहे. यावेळी तिने तिचा वारीमधील अनुभव शेअर केला आहे.
स्पृहाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, “आयुष्यात पहिल्यांदाच वारीचं, पालखीचं वातावरण अनुभवायची संधी मिळाली.. पूर्ण वेळ मी आसपासचे हरीभक्तीत लीन झालेले चेहरे नुसती बघत राहिले होते.. ओढ, समर्पण, असोशी, तळमळ.. सगळे कागदावरचे शब्द.. काल त्या शब्दांची माणसं होताना पाहिली.. पांडुरंग हरी.
स्पृहा ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. स्पृहाने शेअर केलेला व्हिडीओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक सोशल मीडिया युजर वेगवेगळ्या कमेंट करताना दिसत आहेत. भक्तिमय अनुभुती …छानच, जय हरी विठ्ठल, अशा अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<