पूजा चव्हाण प्रकरणानंतर पहिल्यांदाच संजय राठोड राहणार मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित

sanjay rathod

यवतमाळ : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी भाष्य केल्यानंतर शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड मुंबईला रवाना झाले आहेत. यवतमाळमधील निवासस्थानाहून सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ते सपत्नीक रवाना झाले. मुंबईतील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत.

संजय राठोड यवतमाळहून नागपूरच्या दिशेने रवाना झाले. सकाळी सव्वा अकरा वाजताच्या विमानाने ते मुंबईला येतील. यावेळी त्यांची पत्नी शीतल राठोड सोबत आहे. “माझं सुरळीत काम सुरु झालं आहे. माझ्या शासकीय कामांना सुरुवात करतोय. मंत्रिमंडळ बैठकीला मी रवाना होतोय” अशी माहिती राठोडांनी निवासस्थानाहून निघताना दिली. आज दुपारी साडेतीन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. याआधीच्या बैठकीला राठोड ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात होतं.

संजय राठोड काल (२३ फेब्रुवारी) वाशिममधील पोहरादेवी गडावर गेले होते. पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉट रिचेबल होते. मात्र, काल ते समोर आले. यावेळी पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले होते.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर गेले होते. कोरोना संदर्भातली बैठक सुरू असताना शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहचले असतानाच चर्चांना उधान आले होते. या बैठकीनंतर शरद पवार यांनी संजय राठोड यांच्या पोहरादेवी मधील शक्ती प्रदर्शनावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या