मुख्यमंत्र्यांसाठी 100 खासदारक्या कुर्बान करायला तयार : खा.पाटील 

टीम महाराष्ट्र देशा : खासदार कपिल पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याच्या तसेच काँग्रेस प्रवेशाबाबत चर्चा केल्याच्या बातम्या माध्यमांत येत आहेत. मात्र, या वृत्ताचा खासदार  पाटील यांनी  इन्कार केलाय. मी कोणत्याही इतर पक्षात जाणार नाही. माझा पक्ष भारतीय जनता पक्षच आहे असं म्हणत कॉंग्रेसमध्ये प्रवेशाच्या बातम्या निराधार असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांसाठी मी 100 खासदारकी कुर्बान करायला तयार असल्याचं  देखील त्यांनी म्हटलं आहे.

मी कोणत्याही नेत्याला भेटलेलो नाही. मी कोणत्याही इतर पक्षात जाणार नाही. माझा पक्ष भारतीय जनता पक्षच आहे व राहणार आहे. 2019 मध्ये भिवंडीमधून मीच भाजपचा उमेदवार असणार व पुन्हा खासदार होणार अशी स्पष्ट भूमिका भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

नेमकं काय म्हणाले  खा.पाटील   ?

Loading...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे. एकेकाळी मी राजकारणातून बाजूला पडलो असताना त्यांनी मला साथ दिली. त्यांच्या प्रेमाला, विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. ते उत्तम काम करत आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहणे मी माझे कर्तव्य समजतो. पुन्हा खासदारकी मिळविण्यासाठी मी इतर पक्षात जाणार अशा थोतांड बातम्या मागील काही दिवसांपासून जाणून बुझून पेरल्या जात आहेत. पण मला काही फरक पडत नाही. माझी व माझ्या पक्षाची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. पण देवेंद्र फडणवीसांसाठी असल्या 100  खासदारक्या मी कुर्बान करायला तयार आहे.