राजधानीत १५ ते १९ फेब्रुवारीदरम्यान ‘छत्रपती शिवाजी महोत्सवाचे’ आयोजन

shivaji maharaj

नवी दिल्ली: श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटीआणि दिल्लीतील मराठी संस्था यांच्या वतीने 15 ते 19 फेब्रुवारी 2019 दरम्यान’छत्रपती शिवाजी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.

Loading...

‘छत्रपती शिवाजी महोत्सवात’ वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यातयेणार असून हे सर्व कार्यक्रम येथील रफी मार्गावरील मावळणकर सभागृहात करण्यात येणार आहे.

‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ चे सादरीकरण
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व आतापर्यंत 700 हून जास्त प्रयोग झालेले ‘शिवाजीअंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक 16 फेब्रुवारी 2019 रोजी सायं.6.30वा. सादर होणार आहे. विद्रोही शाहिरी जलसा व रंगमाळा यांचे सादरीकरणअसणाऱ्या या नाटकाची संकल्पना व गीत प्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांचेआहे. नाटकाचे लेखक राजकुमार तांगडे तर दिग्दर्शक नंदू माधव आहेत.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी 15 फेब्रुवारी रोजी जागतिक किर्तीचे कलाकार एस.बी.पोलाजी यांनी रेखाटलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरआधारित’ रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शनसकाळी 10 वाजतापासून सर्वांसाठी खुले राहणार आहे. याच दिवशी सायंकाळी6.30 वाजता प्रसिद्ध वक्ते व इतिहास संशोधक श्रीमंत शिवाजी कोकाटे यांचे‘शिवाजी महाराजांच्या जीवनगाथेवर’ व्याख्यान होणार आहे.

‘शिव कल्याण राजा’ संगीतमय कार्यक्रम

स्वरभारती प्रस्तुत ‘शिव कल्याण राजा’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन 17फेब्रुवारी रोजी सायं 6 वाजता करण्यात येणार आहे. प्रसिद्ध गायक व संगीतकारपं. हृदयनाथ मंगेशकर व कलाकार संगीतमय प्रस्तुती करतील तर विद्यावचस्पती शंकर अभ्यंकर या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.

 Loading…


Loading…

Loading...