‘या’ कारणामुळे मुलाखतीला बबन शिंदे आणि दिलीप सोपल यांनी मारली दांडी

blank

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे सत्र सुरु केले आहे. आज सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. मात्र या मुलाखतीसाठी माढा मतदारसंघाचे आ. बबन शिंदे आणि बार्शीचे आ. दिलीप सोपल हे अनुउपस्थित होते.

आता या दोन्ही नेत्यांच्या गैरहजेरीचं कारण समोर आलं आहे. दिलीप सोपल श्रीशैल येथे दर्शनाला गेल्याचे अजित पवार यांनी सांगितले. बबनदादा का आले नाहीत हे त्यांना विचारु. करमाळ्यातून संजय शिंदे इच्छुक असले तरी चार भिंतींच्या आड बसून निर्णय घेऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप सेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे बबन शिंदे आणि दिलीप सोपल हे देखील पक्षांतर करणार असल्याची चर्चा आहे. गेले काही दिवस या दोन्ही नेत्यांनी युतीच्या नेत्यांशी चांगलीचं जवळीकता वाढवली आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते भाजप-सेनेत आपले बस्तान बसवणार असल्याचं दिसत आहे.