महागाई कमी करण्यासाठी २८ टक्क्यांची कररचना संपुष्टात आणावी – सुब्रमण्यम

नवी दिल्ली : जीएसटी काही प्रमाणात सुटसुटीत करणे आवश्यक असून, यासाठी सर्वप्रथम २८ टक्क्यांची कररचना संपुष्टात आणावी लागेल तसेच अबकारी करामध्ये देखील सारखेपणा आणणे गरजेचे असल्याचे, माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी म्हंटलं आहे. ते एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलतं होते.

रविंद सुब्रमण्यम यांनी गेल्या आठवड्यात खासगी कारणांमुळे आपल्या मुख्य आर्थिक सल्लागर पदाचा राजीनामा दिला होता.त्यांचा कार्यकाळ मे २०१९ मध्ये संपणार होता मात्र, त्यापूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

दरम्यान मला वाटतं की, २८ टक्क्यांची कररचना संपवायला हवी. अबकारी कर असायला हवा मात्र, यामध्ये समानता हवी. सध्या ४ टक्के, ५ टक्के, १२ टक्के आणि २८ टक्के अशी कररचना जीएसटीमध्ये आहे. यांपैकी वस्तूंच्या किंमती कमी करण्यासाठी सर्वांत आधी २८ टक्क्यांची कररचना संपवणे गरजेचे असल्याचं त्यांनी म्हंटलं.