मुंबई: एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिली असल्याने राजकारणात एकाच चर्चा रंगली आहे. यावरून भाजपने शिवसेनेला धारेवर धरले असतानाच आता शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काही कारण नसताना एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिली आहे. काही संबंध आहे का? हाच खऱा डाव आहे. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आता यावरच भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.
“AIMIM शी युती नाही तो भाजपाचा डाव असे मुख्यमंत्री सांगत असले तरी सत्तेसाठी काहीही हेच सेनेचे धोरण आहे. कारण अंबादास दानवे कसे निवडून आले? २० ॲागस्ट २०१९ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत AIMIM च्या २६ पैकी २४ जणांनी कुणाला मतदान केले? त्यावेळी या नगरसेवकांना AIMIM ने नोटीस दिली होती.”, असे केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत म्हटले आहे.
MIM शी युती नाही तो भाजपाचा डाव असे मुख्यमंत्री सांगत असले तरी
सत्तेसाठी काहीही हेच सेनेचे धोरण कारण
◾️अंबादास दानवे कसे निवडून आले?
◾️20ॲागस्ट2019 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत MIM च्या २६पैकी २४ जणांनी कुणाला मतदान केले?
◾️त्यावेळी या नगरसेवकांना MIMने नोटीस दिली होती.— Keshav Upadhye (@keshavupadhye) March 20, 2022
उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले?
काही कारण नसताना एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिली आहे. काही संबंध आहे का? हाच खऱा डाव आहे. एमआयएने ऑफर द्यायची आणि मग नंतर भाजपाने यावरुन टीकेचा भडीमार सुरु करायचा. औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही इतकी कडवट निष्ठा असताना उगाच हा मुद्दा काढायचा आणि आम्ही हिंदुत्वापासून दूर चाललो आहोत हे दाखवायचं. आम्ही काय मूर्ख नाही. असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपला लगावला आहे.
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित करतात याबाबत वक्तव्य केले. राज्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसंच राज्यात गेल्या अडीच वर्षात शिवसेनेनं केलेल्या आणि करत असलेल्या विकासात्मक कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेनेनं ‘शिवसंपर्क अभियान’ सुरू केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- तुकाराम बीजनिमित्त देवेंद्र फडणवीस देहूत तुकोबांच्या चरणी; फोटो व्हायरल
- दुध उत्पादन वाढीसाठी करा ‘या’ चाऱ्याची लागवड
- IPL 2022 : कशी नशिबानं थट्टा मांडली..! ‘स्टार’ खेळाडू बनला गुजरातचा नेट बॉलर; वाचा सविस्तर!
- Russia Ukraine War; रशियाचा पुन्हा युक्रेनियन शाळेवर बॉम्ब हल्ला
- “मोदींनी अनेक जागतिक नेत्यांना पिछाडीवर टाकले”, चंद्रकांत पाटलांकडून स्तुतिसुमने