पुढचे अजून काही दिवस राज्यात हुडहुडी कायम असणार

blank

टीम महाराष्ट्र देशा :  उन्हाळ्याची सुरवात होताच थंडीने गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा आपला कडाका सुरु केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील तापमानाचा पारा बराच खाली आला आहे . मुंबई , पुणे , नाशिक , औरंगाबाद , अहमदनगर , नागपूर या मुख्य जिल्ह्यानबरोबरचं इतर जिल्ह्यान मध्ये देखील थंडीचा कडका चांगलाच आहे. तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील अजून दोन दिवस राज्यभरात गारठा राहणार असून पूर्व व मध्य महाराष्ट्रात गारठा जास्त असणार आहे.

पुढील आठवडाभर राज्याच्या वातावरणातील हवेच्या दाबात वाढ होणार आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होऊन थंडी वाढणार आहे. गेल्या काही दिवसात उत्तर भारतात हिमवर्षाव झाल्याने हा गारठा मध्य भारतात वाढला आहे. थंडीची ही अचानक आलेली लाट चांगलीच मारक ठरत आहे.

गेल्या २४ तासात महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात 4.9 अंश सेल्सियस एवढे किमान तापमान नोंदले गेले आहे. तर मुंबई मध्ये 16.8 एवढे कमाल तापमान आहे. पुण्यात आणि नाशिक मध्ये देखील तापमानात चांगलीच घट झाली आहे.