लिंगायत समाजाचा स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी 3 सप्टेंबरला  लातुरात महामोर्चा 

FOR NEW RELIGION ingayat-community-morcha-

लातूर: ( प्रतिनिधी) लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची संविधानिक मान्यता मिळावी तसेच राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याकाचा दर्जा मिळावा या प्रमुख मागणी साठी उद्या (3 सप्टेंबर) लातुरात लिंगायत समाजाकडून महामोर्चाचे  आयोजन करण्यात आलं असून राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज हे  या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत.
भारता मध्ये लिंगायत समाजाची संख्या लक्षणिय आहे. हा समाज विकासापासून वंचित आहे. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यतेसाठी व राष्टीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळवा या साठी लिंगायत धर्म महामोर्चाचे आयोजन करण्यात आलं आल्याच राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी अहमदपूर येथील पत्रकार परिषदेत केले.

लिंगायत धर्माला राज मान्यता  मिळाल्यास अल्पसंख्यांकाचा दर्जा तसेच  शिक्षणात विध्यार्थ्यांना सवलती मिळतील आणि समाजाचा विकास साधला जाईल यासाठी हा महामोर्चा असल्याच
त्यांनी सांगितलं. देशातील सात कोटी इतकी लोकसंख्या असलेल्या लिंगायात धर्मात  300 जाती आणि 350 पोट जातींचा समावेश असून सर्वांनी न्याय मिळवा तसेच लिंगायत धर्माची रद्द झालेली मान्यता पुन्हा मिळावी यासाठी हा मोर्चा असल्याचं उस्तुरी मठाचे कोरनेश्वर म्हस्वामींनी यांनी म्हटलंय.