अनेक वर्षापासून हा झेंडा माझ्या मनातून जात नव्हता : राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : पूर्वीपासून हा भगवा झेंडा माझ्या मनात होता. मात्र इतरांच्या आग्रहाखातर त्यात अनेक त्यात अनेक रंग घेतले गेले. मात्र माझ्या मनातून भगवा झेंडा जात नव्हता. त्यामुळे मनसेच्या महाअधिवेशनाच्या निमित्ताने हा झेंडा बदलण्याचा निर्णय घेतला आणि तो बदलला. यापूर्वी १९८० मध्ये जनसंघानेदेखील आपल्या पक्षाच्या नावासह झेंडाही बदलला आहे. असे स्पष्टीकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज महा अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाची सांगता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाने झाली. यावेळी बोलताना त्यांनी बदलेल्या झेंड्याबद्दल पक्षाला आणि कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. मनसेच्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. हा झेंडा हातात घेतला तर तो इकडे तिकडे पडलेला चालणार नाही. हा झेंडा निवडणुकीच्या वेळेला हा झेंडा वापरायचा नाही. या राजमुद्रेचा मन राखला गेला पाहिजे. अशी सक्त ताकीद यावेळी राज ठाकरे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना दिली.

Loading...

मला विचारले गेले झेंडा बदलला आता हिंदुत्त्वाची कास धरली का, आता मराठीच काय होणार, हिंदुत्त्वाच काय होणार असे मला विचारण्यात आले, तर आताच सांगून ठेवतो, सकारात्मक कामासाठी बदल हवा असतो. त्यासाठी आता मनसेने कात टाकली आहे. माझं धर्मांतर झालेलं नाही, मी मराठी आहे आणि मी हिंदूदेखील आहे. जर मराठीला नख लावलं तर मी मराठी म्हणून अंगावर जाईल आणि माझ्या धर्माला नख लावलं तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'