fbpx

विधानसभेसाठी एका मराठ्यानं एक लाख मतांचं नियोजन करावं : पंकजा मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारने मराठा समाजला देऊ केलेले आरक्षण हे वैध असल्याच उच्च न्यायालयाने आपल्या अंतिम निकालात जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यभरातून मराठा समाजाच्या वतीने फडणवीस सरकारचे आभार मानले जात आहेत. तर आज बीड जिल्ह्यातील परळी येथे मराठा समाजाच्यावतीने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. आरक्षणासाठी आपण एक मराठा लाख मराठा ही घोषणा दिली. आता, एका मराठ्यानं एक लाख मतांचं नियोजन करायच आहे, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. विशेष म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाल आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळव हे मुंडेसाहेबांचा स्वप्न होतं. तसेच मराठा आरक्षणावेळी आपण एक मराठा लाख मराठा ही घोषणा दिली. आता, एका मराठ्यानं एक लाख मतांचं नियोजन करायच आहे, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने देखील टोलेबाजी केली. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझी लढाई कुणाशाही नाही, माझ्या लढाईत सामान्य माणूस माझ्यासोबत आहे. त्यामुळे निवडणुकांवेळी माणसाच्या कर्तृत्वाला बघून मतदान करा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर निर्णय दिला असून, नोकरी आणि शिक्षणिक शेत्रातील आरक्षण वैध आहे, परंतु १२ ते १३ टक्के आरक्षण देता येईल असेही न्यायालयाने म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर राज्य सरकारला १०२ च्या घटना दुरुस्तीनुसार आरक्षण देण्याचा अधिकार आहे. आयोग नुसार मराठा समाज मागास आहे. अपवादात्मक स्थितीत ५० टक्के आरक्षणात बदल शक्य असल्याचेही न्यायालयाने म्हंटले. याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण सुरु राहील परंतु १६ टक्के नाही, असेही न्यायालयाने म्हंटले आहे.