आषाढी एकादशीनिमित जादा रेल्वे गाड्या

 टीम महाराष्ट्र देशा : लाखो विठ्ठल भक्त पंढरपुरच्या वारीसाठी निघाले आहेत. वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपुर आषाढी एकादशीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात प्रसिद्ध आहे. लाखों भक्तांचा मेळा पंढरपुरमध्ये आषाढी एकादशीला जमणार आहे. भाविकांना पंढरपुरला जाण्यासाठी रेल्वे विभागाने विशेष रेल्वेगाड्या सोडल्या असून मुंबई, नवी अमरावती, खामगाव, लातूर व मिरज-कुर्डूवाडी मार्गावर ७२ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मिरज या गाडीच्या दोन फेऱ्या होतील. ही गाडी दि. २२ जुलैला मध्यरात्री १२.२० वाजता मुंबई स्थानकातून सुटून त्याच दिवशी दुपारी ४.०५ वाजता मिरज स्थानकात पोहोचेल. तर, दि. २३ जुलैला रात्री ८.५५ वाजता मिरज स्थानकातून परतीचा प्रवास सुरू होईल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, धालगाव हे थांबे असतील. पंढरपूर-कुर्डूवाडी या गाडीच्या १२ फेऱ्या होणार असून ही गाडी दि. २०, २१, २२, २७, २८, २९ जुलैला दुपारी १.३५ वाजता पंढरपूर स्थानकातून सोडण्यात येणार आहे. तर, त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता कुर्डूवाडी स्थानकातून पंढरपूरकडे प्रस्थान करेल.  मिरज व पंढरपूर मार्गावर दि. १९ ते २८ जुलैदरम्यान दररोज डेमू
सोडण्यात येईल. ही गाडी मिरज स्थानकातून सकाळी ५.३० वाजता, तर पंढरपूर स्थानकातून सकाळी ९.५० वाजता सुटेल. मिरज व कुर्डूवाडीदरम्यानही अनुक्रमे दुपारी २.४० व रात्री ८.३० वाजता डेमू गाडी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Rohan Deshmukh

नवी अमरावती ते पंढरपूर अनारक्षित गाडीच्या चार फेऱ्या होतील. ही गाडी दि. १७ व २० जुलै रोजी दुपारी २ वाजता नवी अमरावती स्थानकातून सुटून दुसºया दिवशी ११.१५ वाजता पंढरपूर येथे पोहचेल. तर पंढरपूर येथून दि. १८ व २४ जुलैला दु. ४ वाजता सुटेल. खामगाव ते पंढरपूर ही गाडी दि. १९ व २५ जुलैला सकाळी ११.१५ वाजता खामगाव स्थानकातून पंढरपूरकडे रवाना होईल. तर, पंढरपूर स्थानकातून त्याच दिवशी सकाळी दुपारी ४ वाजता निघेल. लातूर ते पंढरपूर ही दि. २०, २३, २४, २५ व २७ जुलैला सकाळी ७.४५ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करेल, तर त्याच दिवशी दुपारी २ वाजता पंढरपूर स्थानकातून सुटेल.

जेऊर रेल्वे स्टेशनवर उद्यान एक्सप्रेसला थांबा द्यावा;जेऊर व्यापारी संघटनेची मागणी.

 

Latur Advt
You might also like
Comments
Loading...