विद्यापीठाच्या मनमानी कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका 

uni pune1

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने 13 विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची जाहिरात प्रसिद्ध करताना हलगर्जीपणा केल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. विभागातील पदव्युत्तर पदवी व पदविका प्रवेशासाठी दहावी व बारावीला संस्कृत विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाचा प्रवेश घेता येणार आहे. विद्यापीठाकडून प्रवेशासाठी अर्ज केल्यानंतर अशी अट ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. विविध शाखेत पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ३५० रुपये शुल्क
भरून अर्ज केले. विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान झाले आहे.

विद्यापीठाकडून विविध 13 अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत. मात्र विद्यापीठाने मनमानी करत प्रवेश प्रक्रियेत नवीन बदल केले आहेत. त्यामुळे फक्त 45 प्रवेश झाले आहेत. तसेच तीन वेगवेगळ्या पी जी कोर्स साठी 7 प्रवेश झाले आहेत. त्यामुळे एकूण 90% जागा रिक्त आहेत. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी जागा रिक्त असल्यामुळे प्रवेश देण्याची विनंती कुलगुरूनां केली आहे. तसेच विद्यापीठाच्या मनमानी कारभारा विरोधात विद्यार्थी संघटना आज आक्रमक पवित्रा घेणार आहेत.

विभागाकडून जाहीरात प्रकाशित करताना
चूक झाली आहे. मात्र, यापुढे तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची चूक करता येणार नाही. नियमानुसार आणि शैक्षणिक अटींनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील
 डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू

रिक्त असलेल्या 90 जागा विद्यापीठाने त्वरित भराव्या. प्रवेशासाठी आधी कोणत्याही शाखेचा पदवीधर व संस्कृतच ज्ञान. अशी अट होती. मात्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यावर प्रवेश प्रक्रियेत फेरफार केले. आणि  प्रवेशासाठी अकरावी व बारावीत संस्कृत असलेल्यांनाच प्रवेश दिला आहे. विद्यापीठाची चूक असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. पुढील वर्षापासून नवीन अट अमलात आनावी. या सर्व प्रकरणाबाबत उद्या 11 वाजता अभाविपतर्फे विद्यापीठात आंदोलन करण्यात येणार आहे 
 श्रीराम कंधारे, अभाविप विद्यापीठ प्रमुख