फिरत्या अन्न विक्रेत्यांशी मार्गदर्शकाच्या भूमिकेत वागा : मंत्री गिरीश बापट

girish bapat

पुणे :  राज्यात रस्त्यावरील अन्न पदार्थ खाणाऱ्या लोकांची संख्या बहुसंख्य आहे. त्यामुळे अशा लोकांना सुरक्षित अन्न खायला मिळावे यासाठी रस्त्यावर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी राज्याच्या अन्न औषध प्रशासन विभागातर्फ़े चालवण्यात येणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. हातगाडी विक्रेत्यांना मित्रत्वाच्या व मार्गदर्शकाच्या  नात्याने सांगितल्यास त्यांच्याकडून ही पूर्ण सहकार्य मिळते त्यामुळे त्यांच्याशी अधिकाऱ्यांनी सौजन्याने वागावे अशी सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिली.

अन्न व औषध प्रशासन ,पुणे विभाग तसेच कोका कोला इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने  टिळक वाडा येथे रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांसाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे तसेच विक्रेत्यांना प्रशिक्षित करणाऱ्या क्लासरूम ऑन व्हील‘ या बसचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. स्वच्छतेसंबंधी माहिती देणाऱ्या पोस्टरचे अनावरण ही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

या कार्यशाळेस ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव,प्रभाग समितीचे अध्यक्ष राजेश येनपुरे,नगरसेवक महेश लडकत कोका कोला इंडियाचे बोराळकर यांच्यासह अन्न औषध विभागाचे सहायक आयुक्त श्री नारागुडेदेशमुखशिंदे,भुजबळश्रीमती भोईटे तसेच अन्न सुरक्षा अधिकारी व अन्न पदार्थ विक्रेते उपस्थित होते.

Loading...

 कोकाकोला इंडियाच्या क्लासरूम ऑन व्हील्स‘ या बसमधून  १  ते १५ जानेवारी या कालावधी मध्ये शहरातील ४७ ठिकाणी फिरत्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन प्रशिक्षित करण्यात येणार आहे.

 यावेळी बोलताना श्री बापट म्हणालेपुण्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यातील हातगाडीवर खाणाऱ्या विद्यार्थांची तसेच सर्वसामान्यांची संख्या अधिक आहे. अशा लोकांना सुरक्षित अन्न मिळते का हे पाहण्याची अन्न व औषध विभागाची जबाबदारी आहे.  याकरिता प्रशासनांने त्यांना मित्र आणि मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षित केल्यास ते ही सहकार्याची भूमिका घेतीलकारण लोकांना चांगल्या प्रतीचे अन्न पदार्थ द्यावेत ही त्यांचीही इच्छा असते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन  विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी सौजन्याने वागावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. त्याचप्रमाणे समाजानेही यात पुढाकार घेऊन अन्न विक्रेत्यांना मदतीचा दृष्टीकोन ठेवल्यास विक्रेत्यांना स्वछतेची सवय लागेल. असे ही ते म्हणाले.

खाद्यपदार्थ विक्रेत्यांना ते म्हणालेलोकांना चांगल्या प्रतीचे आणि चवीचे खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिल्यास आणि स्वच्छता राखल्यास जाहिरात न करता लोक तुमच्याकडे खाण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची खाद्य पदार्थ विक्रेत्यांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे लोकांना सुरक्षित अन्न पदार्थ द्यावेतयासाठी हे प्रशिक्षण दिले जात आहे त्याचा जास्तीत जास्त लोकांनी उपयोग करून घ्यावा.

यावेळी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ पल्लवी दराडे यांनी राज्यात अन्न व औषध विभागामार्फत लोकांना सुरक्षित अन्न देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गाची माहिती दिली. तसेच अन्न पदार्थ विक्री व्यवसायकानी त्यांच्या उलाढालीनुसार परवाने किंवा नोंदणी घ्यावी व अधिकाऱ्यांनी  या अभियानात विशेष प्रयत्न करावेत. अशा सूचना केल्या.

ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढाव यांनी स्वच्छते बरोबर लोकांना सकस अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याबाबतही अन्न औषध विभागामार्फत प्रशिक्षण देण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त करत यासाठी त्यांच्या पथारी संघटने मार्फत  सहकार्य करण्याचे मान्य केले.