लवकरच कागदात बांधून खाद्यपदार्थ देणे होणार हद्दपार

मुंबर्इ : मुंबर्इ आणि उपनगरात कागदात बांधून खाद्यपदार्थ देणे हे आता लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. कागदामध्ये गुंडाळून दिलेल्या खाद्यपदार्थांचा शरीरावर होणारा वार्इट परिणाम लक्षात घेता मुंबर्इ महापालिकेतील नगरसेवक एकत्रितपणे ही पद्धत बंद करण्यासाठी प्रस्ताव आणणार आहेत, अशी माहिती अाहे.

कागदात बांधून दिलेल्या खाद्यपदार्थ लोकांसाठी धोकादायक आहे. विशेषत: वृत्तपत्राच्या कागदात बांधून दिलेल्या पदार्थातून कागदाच्या शाईतील विषारी घटक शरीरात जातात. त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. या बाबी लक्षात घेऊन मुंबई व उपनगरात सर्रास कागदात गुंडाळून देण्यात येणाऱ्या वडा पाव आणि इतर पदार्थांवर बंदी घालण्याचा विचार सुरू होत आहे. कागदांमध्ये गुंडाळून खाद्यपदार्थ विक्री करण्यास तत्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक आशिष चेंबूरकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

तसेच, महापालिकेच्या अधिनियमातील तरतुदीनुसार, घातक रोगांच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी तसेच आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे, हे मुंबई महापालिकेचे कर्तव्य असल्याचेही चेंबूरकर यांनी ठराव सूचनेत म्हटले आहे.

वर्तमान पत्रात बांधलेले पदार्थ जर खात असाल तर सावधान ……

Comments
Loading...