Food hunter : सुरळीच्या वड्या

सुरळीच्या वड्या
साहित्य :-
चण्याच्या डाळीचे पीठ 1 कप , ताक 1 कप , पाणी 1 कप ,चवी प्रमाणे मीठ, 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आलं एक इंच, 1/2 चमचा जिरे.फोडणी साठी मोहरी, जिरे, हिंग, तेल, कड़ी पत्ता 7/8 पान. ओले खवलेले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती :-
प्रथम मिरची जिरे आल एकत्र बारीक वाटुन घ्या. मग त्या मधे एक कप पाणी ,एक कप ताक घालुन मिक्स करा आणि गाळुन घ्या. नंतर चण्याच्या पिठात हे पाणी मिक्स करून एकजीव होईपर्यंत घोटून घ्या.कढईत हे मिश्रण घालुन मध्यम आचेवर शिजवावे. मिश्रण साधारण घट्ट झाल्यावर ताटाला तेल लावून घ्या नंतर  चमच्याने थोडे मिश्रण ताटात लावुन घ्यावे.मिश्रण गार  झाल्यावर त्याची सुरळी होत असेल म्हणजे ते घट्ट राहिले तर गॅस बंद करून एक दोन डाव ताटाच्या मागे पातळ पसरावे.मग पसरलेल्या मिश्रणाच्या वड्या कराव्या त्यावर तेलाची फोडणी घालावी आणि ओल खोबरे आणि कोथिंबीर घालुन छान त्याची सुरळी करावी अश्या प्रकारे खमंग अशी सुरळीची वडी तयार आहे.

 टीप : तुमच्याकडे अशा खमंग रेसिपी असतील तर या मेल आयडी वर टाइप करून पाठवा maharashtradesha7@gmail.com आम्ही तुमच्या नावासह प्रसिध्द करू.