मुंबई : अभिनेत्री कंगणा राणावतचे मागील काही दिवसांपूसन राजकीय वाद चालू आहेत. या वादादरम्यान कंगणाच्या कार्यालयावर बीएमसीने कारवाई केली होती कंगनाचे कार्यालय तोडण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये सुशांत सिंग राजपूत आत्महत्या आणि कंगनाचे महाराष्ट्र सरकारवर टीका यावरून महाराष्ट्रातील वातावरण तापले होते. या रागातूनच ही कारवाई केल्याचा आरोप कंगनाने केला होता.
तर या कारवाईशी राज्य सरकारचा काही संबंध नसल्याचे शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते. या कारवाईवर आज उच्चन्यायालयाने निकाल दिला आहे. अभिनेत्री कंगणा हिच्या कार्यालयावरील तोडकामाच्या कारवाईच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला मोठा दणका दिला आहे. उच्च न्यायालयानं बीएमसीची ही कारवाई अवैध ठरवली आहे. ‘महापालिकेने बजावलेली नोटीस आणि त्यानंतर तोडकामाचा काढलेला आदेश दोन्ही रद्दबातल करतानाच, ते कार्यालय महापालिकेला पूर्ववत करून द्यावे लागेल,’ असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
‘कंगनाने कार्यालयात केलेल्या बांधकामावर महापालिकेने केलेली कारवाई ही अत्यंत घाईने आणि वाईट हेतूने, सूडबुद्धीने केल्याचे स्पष्ट दिसत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आधी धमकी व इशारा दिला. त्यानंतर महापालिकेने अत्यंत तत्परतेने कारवाई केली, यावरून प्रशासनाचा कुहेतू होता आणि कायद्याचा आणि सत्तेचा गैरवापर केला, वैयक्तिक द्वेषापोटी कायद्याचे पालन न करता कारवाई केली हे स्पष्ट होते, असं निरीक्षण न्यायालायनं नोंदवलं आहे.
V welcome Highcourt Order on #KanganaRanaut demolition case. Mumbai Mayor & BMC Commissioner should Resign. #SanjayRaut ki Bolti Bandh Ho Gayi @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/DhWqQsZ6QI
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 27, 2020
दरम्यान, हा निकाल येताच भाजपला सरकारवर टीका करण्याची संधी मिळाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारचे तोंड काळं झालं, अशी टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. तर माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमैया यांनी महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांची बोलतीच बंद झाली असेल, असे सोमैया म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- मविआच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवारी दाखल केल्याने ‘या’ नेत्याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
- कोरोनाची दुसरी लाट येईल असे गृहीत धरून सज्ज राहूया : मुश्रीफ
- ‘एखाद्यानं मूर्खपणा केला म्हणून प्रशासन आणि सरकार कायद्याची चौकट मोडू शकत नाही’
- ‘कंगना राणावतला द्यायची नुकसानभरपाई व वकिलांची फी मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून द्यावी’
- आधी छोटे नेते म्हणाले आणि आता चंद्रकांतदादांनी केलं शरद पवारांचं तोंडभरून कौतुक