पंत पाठोपाठ ‘या’ महत्वाच्या खेळाडूलाही कोरोनाची लागण

पंत पाठोपाठ ‘या’ महत्वाच्या खेळाडूलाही कोरोनाची लागण

rishbh

इंग्लंड : गेल्या काही दिवसापासुन भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळल्यानंतर काही काळासाठी भारतीय संघ सुट्टीवर गेला होता. यानंतर आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ विलगीकरणात पोहोचणार होता, मात्र यादरम्यान दोन भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण झाली अशी धक्कादायक माहिती समोर आली.

कोरोनाची लागण झालेल्या दोन भारतीय क्रिकेटपटुपैकी एक खेळाडू हा युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत हा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर थ्रो-डाऊन एक्सपर्ट दयानंद गरानी यांना कोरोनाची लागण झाली. तसेच त्यांच्या संपर्कात आलेला दुसरा यष्टिरक्षक रिद्धीमान साहासह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण व पर्यायी सलामीवीर अभिमन्यू इस्वरन या सर्वांनाही विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे.

‘टीम इंडिया’त कोरोनाचा शिरकाव झाल्याने संघातील खेळाडू विस्कळीत झाले आहेत. त्यामुळे कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय क्रिकेटपटू आपली सुट्टी संपवून गुरुवारी डरहॅममध्ये बायो-बबलमध्ये परतले. मात्र दुर्दैवाने काही खेळाडू अन् सपोर्ट स्टाफमधील काहींना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगळे क्वारंटाईन व्हावे लागले.

महत्वाच्या बातम्या