fbpx

मला मौन बाळगू नये सांगणाऱ्यांनी आता तो सल्ला पाळावा !

टीम महाराष्ट्र देशा : मला जो सल्ला मोदींनी दिला होता, तो त्यांनी आता पाळावा. महत्त्वाच्या विषयांवर मौन बाळगू नये, असा टोला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. कठुआ, उन्नाव आणि सुरत प्रकरणावर मौन बाळगणाऱ्या पंतप्रधांना मनमोहन सिंग यांनी सल्ला दिला आहे.

कठुआ आणि उन्नाव प्रकरणांवर मोदींनी मौन सोडलं हे पाहून बरं वाटलं. पण मला वाटतं पंतप्रधानांनी मला दिलेला सल्ला स्वतः पाळावा, आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर अधिक भाष्य करावं. मोदी आधी बोलायचे नाहीत, त्यामुळे लोकांना वाटायचं त्यांना काहीच शिक्षा होणार नाही. सत्तेत असणाऱ्यांनी योग्य वेळी बोलायचं असतं, जेणेकरून त्यांच्या समर्थकांना इशारा मिळतो. मी सत्तेत असताना भाजप मला मौन-मोहन सिंग म्हणून हिणवायचं. पण आयुष्यभर माझ्यावर हीच टीका होत राहिली आहे. असे मत डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केल आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोदींवर निशाणा साधला. मी मौन बाळगतो, ही टीका माझ्यावर आयुष्यभर होत राहिली, त्यामुळे मोदीही तेच म्हणाले होते त्याचं मला काही वाटलं नाही, असंही ते म्हणाले.