टीम महाराष्ट्र देशा: आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रामुख्याने महिलांना मासिक पाळीशी Period संबंधित समस्यांना झुंज द्यावी लागते. या समस्या मुख्यतः हार्मोनियम बदलांमुळे होऊ लागतात. मासिक पाळी दरम्यान महिलांना पोट दुखी, चक्कर येणे, थकवा जाणवणे इत्यादी समस्या निर्माण होतात. मासिक पाळी सुरू असताना महिलांना अनेक वेदनांना सामोरे जावे लागते. यामध्ये काही महिलांना कमी तर काही महिलांना खूप जास्त वेदना होतात. त्यामुळे महिला या वेदना कमी करण्यासाठी केमिकल युक्त औषधे घेतात. पण ही औषधे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून मासिक पाळी मध्ये असह्य वेदना झाल्यास कोणते घरगुती उपाय करता येईल याबद्दल माहिती सांगणार आहोत. या घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही तुमचे असह्य वेदनेची समस्या दूर करू शकता.
ओवा
मासिक पाळीच्या वेदनेसाठी ओवा एक रामबाण उपाय आहे. तुम्ही पाण्यामध्ये ओवा टाकून ते पाणी पिऊ शकता. यासाठी तुम्हाला एक पाणी उकळून घेऊन त्यात एक चमचा ओवा टाकावा लागेल. हे एक कप पाणी अर्धा कप होईपर्यंत उकळवा. पाणी अर्ध झाल्यावर त्यामध्ये चिमूटभर काळे मीठ टाकून गरम गरम पाण्याचे सेवन करा. ओव्याचे हे पाणी पिल्याने तुमच्या वेदना काही वेळातच दूर होतील. आणि ओव्याचे पाणी पिल्याने तुमच्या आरोग्याला कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण होत नाही. मासिक पाळी दरम्यान तुम्हाला जर खूप जास्त वेदनेचा सामना करावा लागत असेल तर दिवसातून तीन-चार वेळा तुम्ही ओव्याचे पाणी पिऊ शकता.
हळद
हळदीमध्ये मुबलक प्रमाणात अँटी-इम्प्लोमेंटरी गुणधर्म आढळतात. त्यामुळे हळदीचे सेवन केल्याने पोट दुखीवर आराम मिळू शकतो. मासिक पाळी दरम्यान तुम्ही हळदीचे देखील पाण्यात टाकून सेवन करू शकता. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाणी घेऊन त्यात दोन चमचे हळद मिसळावी लागेल. त्यानंतर पाणी आणि हळद चांगले उकळून घ्या. कारण हळद पाण्यात उकळून घेतल्यावर त्यातला कडवटपणा दूर होईल. हळदीचे पाणी चांगले उकळून घेतल्यावर त्यात एक चमचा मध टाकून त्या पाण्याचे सेवन करा. यामुळे तुम्हाला तुमच्या मासिक पाळीच्या असह्य वेदनेतून आराम मिळू शकतो.
मासिक पाळी Period सुरू असताना जास्तीत जास्त पाणी प्या
मासिक पाळी दरम्यान सतत आणि जास्त प्रमाणात गरम पाण्याचे सेवन करत राहिले तर मासिक पाळी मध्ये होणाऱ्या वेदनांपासून तुम्हाला आराम मिळू शकतो. त्याचबरोबर तुम्ही मासिक पाळी दरम्यान पाण्याचा चहा देखील पिऊ शकतात. यामुळे तुमच्या मासिक पाळीतील वेदना कमी होऊन तुमचे शरीर हायड्रेट राहील.
टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Shahajibapu Patil | उद्धव ठाकरेंच्या सांगोला दौऱ्यावरून शहाजीबापू पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Adhar Card | आधार कार्ड वरील फोटो बदलायचा असेल, तर ‘या’ स्टेप्स करा फॉलो
- T-20 World Cup । दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला संधी द्या; कपिलदेवचा टीम इंडियाला सल्ला
- Shahajibapu Patil | बच्चू कडू अन् रवी राणा यांच्या वादावर शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Gulabrao Patil | रवी राणा यांना आवर घाला; गुलाबराव पाटलांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी