होय लालूंनी चारा खाल्ला;चारा घोटाळा प्रकरणात लालूप्रसाद यादव दोषी

prasad lalu

टीम महाराष्ट्र देशा- चारा घोटाळा प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलंय. लालूप्रसाद यादव यांची 1990 नंतरची संपत्तीही जप्त होणार आहे.या प्रकरणात सात जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लालूप्रसाद यादव यांच्यासाठी हा निकाल मोठा धक्का मनाला जात आहे.लालू प्रसाद यादव या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत. आता पुढील महिन्यात 3 जानेवारीला लालूंना शिक्षा सुनावली जाणार आहे.

लालूप्रसाद यादव यांच्यासह दोषींना ३ जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे. मात्र तोपर्यंत लालूप्रसाद यादव यांचा मुक्काम तुरुंगातच असणार आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे लालूप्रसाद यादव यांचे नवे वर्ष तुरुंगातच जाणार आहे. कोट्यवधी रूपयांचा चारा घोटाळा देशभरात चांगलाच गाजला होता. त्यामुळे लालूप्रसाद यादव यांना गमवावे लागले होते.