fbpx

चारा घोटाळ्यात आज लालूंचा फैसला ; कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं केल आवाहन

lalu-prasad-

टीम महाराष्ट्र देशा: १९९६ च्या दरम्यान देश बिहारमधील चारा घोटाळ्याने हादरला होता. यात मुख्य आरोपी होते लालू प्रसाद यादव या घोटाळ्यासाठी ते तुरुंगात सुद्धा जाऊन आले आणी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामामा सुद्धा त्यांना द्यावा लागला होता.

आज याच चारा घोटाळा प्रकरणी कोर्टाचा निकाल येणार आहे. आजच्या कोर्टाच्या निर्णयावर लालू प्रसाद यादव यांचे भवितव्य ठरणार असून बिहारच्या राजकारणाच्या दिशा सुद्धा ठरणार आहे. चारा घोटाळाप्रकरणी सीबीआयचे विशेष कोर्ट फैसला सुनावणार आहे. नुकतच टूजी घोटाळ्यातील सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत तर बहुचर्चित आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाण यांची सुद्धा मुक्तता झाली आहे. त्यामुळे लालूंना सुद्धा या घोटाळ्यातून आपण सहीसलामत बाहेर येऊ अशी आस लागली आहे. आपल्याला भाजपने जाणून-बुजून या प्रकरणात अडकवल्याचा आरोप लालूंनी केला आहे, तर कोर्टाचा निकाल काहीही येवो पण कार्यकर्त्यांनी संयम बाळगण्याच आवाहन लालू प्रसाद यादव यांनी केल आहे.