प्रवासी आणि पादचा-यांचे प्राण वाचविणा-या कार्यक्षम बसचालकाचा सत्कार

पुणे, दि. २९ जानेवारी, २०१९ : चालू गाडीचे ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येत प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणीत ५३ प्रवाशांचे प्राण वाचविणा-या हनुमंत नरवडे या बसचालकाचा सत्कार करीत पीएमपीएमएलचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. हनुमंत नरवडे यांना यावेळी शिरोळे यांच्या वतीने रोख रु. पाच हजार देत त्यांचा सन्मान करण्यात आला.

हनुमंत शंकर नरवडे हे बसचालक असून मागच्या आठवड्यात शनिवारवाडा ते न-हेगाव या मार्गावर न-हेगाव येथून परत येत असताना ते चालवीत असलेल्या क्र. १५८७ या गाडीचे ब्रेक अचानक फेल झाले. वेळेचे गांभीर्य आणि प्रसंगावधान राखत नरवडे यांनी गादीवर ताबा मिळवीत ती थांबवली. त्यांच्या या सतर्कतेने बसमधील ५३ प्रवासी आणि पादचा-यांचे प्राण वाचले. नरवडे यांनी दाखविलेल्या या दक्षतेचे कौतुक करीत पुणे प्रादेशिक परिवहन महामंडळाचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी आज त्यांचा सत्कार केला. यावेळी पीएमपीएमएलच्या महासंघाचे कर्मचारी, बाबुल नेटके, राजेंद्र खराडे, नुरुद्दीन इनामदार, जावेद तांबोळी, सागर कांबळे, लक्ष्मण कुंभार, पंढरीनाथ गांगुर्डे, दीपक पिंगळे, आसिफ झारी आदी उपस्थित होते.

1 Comment

Click here to post a comment