‘आधी मुलींच्या लग्नाचं वय वाढवलं, आता आई होण्याचं वयही ठरणार’

टीम महाराष्ट्र देशा : आज लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2020-21 चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सीतारमण यांनी महिलांसाठी मोठ्या घोषणा, महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे. तसेच महिलांशी निगडित विशेष उपक्रमांसाठी 28600 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

याचप्रमाणे ‘आधी मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्यात आलं होतं. आता आमचं सरकार मुलींच्या आई होण्याच्या वयावरही विचार करत आहे. यासाठी एका ‘टास्क फोर्स’ची स्थापना केली जाईल. ही टास्क फोर्स 6 महिन्यांमध्ये या विषयावरील आपला अहवाल सादर करेल,’ असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.

तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी खास महिलांसाठी एकूण 28 हजार 600 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. याचप्रमाणे केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ योजनेला जनतेनं चांगला पाठिंबा दिला आहे. या योजनेमुळे मुलगी-मुलगा गुणोत्तरात सुधारणा झाली, असे सीतारामन म्हणाल्या.

दरम्यान, दरम्यान, ग्रामीण भागात इंटरनेटचं जाळं पसवरणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं. भारत नेट योजनेद्वारे गावांमध्ये इंटरनेट पसरवलं जाणार. यासाठी 6 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. तसेच उडान योजने अंतर्गत नव्या 100 विमानतळांची निर्मिती केली जाणार आहे असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.