टीम महाराष्ट्र देशा: आपण आतापर्यंत रस्त्यावर धावणाऱ्या अनेक आलिशान गाड्या पाहिल्या आहेत. त्यामध्ये हाय स्पीड ते सर्वोत्तम फीचर्स असलेल्या अनेक गाड्यांचा समावेश होतो. याच सेगमेंटमध्ये आपल्याला रोज नवनवीन गाड्या लाँच होताना पण दिसतात. त्याचबरोबर आपण अनेक वेळा ऐकत आलेलो आहोत की 2050 पर्यंत आपल्याला उडणाऱ्या गाड्या बघायला मिळतील. पण आपली ही प्रतीक्षा लवकर संपणार आहे. कारण नुकताच दुबईमध्ये फ्लाईंग (Flying) कार X2 चा दुसरा पर्याय सादर करण्यात आला आहे.
फ्लाईंग (Flying) कार X2
चीनमधील आघाडीची इलेक्ट्रॉनिक वाहन उत्पादक कंपनी Xpeng Inc ने बनवलेले ही फ्लाईंग (Flying) कार X2 आहे. दुबईमध्ये ही कार सर्वांसमोर पहिल्यांदा सादर करण्यात आली आहे. फ्लाईंग कार बरोबरच कंपनी भविष्यात इलेक्ट्रिक विमान लाँच करायच्या प्रकल्पावर काम करत आहे, अशी देखील माहिती मिळाली आहे.
फ्लाईंग (Flying) कार X2 ही एक आरामदायी कार असून यामध्ये लोक प्रवास करू शकतील. व्हार्टिकल टेक ऑफ आणि लँडिंगसाठी या कारच्या चारही कोपऱ्यात 8 प्रोपेलर बसवण्यात आले आहे. त्याच्या मदतीने ही कार हवेत उडू शकते. 130 km प्रतितास वेगाने ही कार जास्तीत जास्त टेक ऑफ करू शकते. ही कार सध्याच्या पावर क्षमतेवर कार 90 मिनिटे हवेत उडू शकते.
फ्लाईंग कार X2 चे फायदे
आजकाल वाढत्या ट्रॅफिकच्या काळात ही कार रहदारीसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. कारण आजकाल वाहतुकीच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे. ही कार इमर्जन्सी मध्ये सर्वात जास्त उपयुक्त ठरू शकते कारण या कारचे टेकअप आणि लँडिंग पॉईंट फिक्स असतील. ही फ्लाईंग कार ऍम्ब्युलन्स सारख्या कामासाठी देखील खूप महत्त्वाचे ठरेल. त्याचबरोबर ही फ्लाईंग कर अंतर कमी करण्यासाठी मदत करू शकेल.
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi | “मोदी जगाचे नेते झाले, पण देशाचे पंतप्रधान कधी होणार?”; शिवसेनेचा मोदींवर निशाणा
- Maharashtra Rain Update | राज्यात आज पश्चिम महाराष्ट्रासह ‘या’ भागात पावसाचा येलो अलर्ट
- Atul Bhatkhalkar | प्रक्षोभक भाषणाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सुषमा अंधारेंनी दिलेल्या ‘त्या’ प्रतिक्रियेवर भातखळकर म्हणाले…
- Andheri By Elections | भाजपच्या मुरजी पटेलांचा निवडणुक अर्ज भरण्याचा कार्यक्रम ऐनवेळी झाला रद्द, राजकीय चर्चांना उधाण
- Atul Bhatkhalkar | ‘फरक पडायला शिल्लक तरी काय राहिलंय तुमच्याकडे?’, अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा