उडने दो धूल को, कहा तक उडेगी, हवाओने साथ छोडा, तो जमीन पर ही गिरेगी- धनंजय मुंडे

dhananjay munde

मुंबई: भाजपा सरकार केवळ घोषणाबाज सरकार आहे, मागील अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी झाली नाही. अर्थसंकल्पातून चांदा गेले आणि बांदा आले. सरकारचा हा अर्थसंकल्प शेवटचा असून भाजपाने फसवा अर्थसंकल्प सादर केल्याची टीका विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.

Loading...

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंदाचाअर्थसंकल्प सादर करताना कवितांचा मनमुराद वापर करून सरकारचे गोडवे गात विरोधकांवर शरसंधान केले होते. दरम्यान, धनंजय मुंडे म्हणाले, निव्वळ आवेशपूर्ण आणि शेरो-शायरीने भाषण करून जनतेच्या पदरी काही पडणार नाही. ज्यांना विजयाचा गर्व झाला आहे त्यांची अवस्था ‘ उडने दो धूल को, कहा तक उडेगी, हवाओने साथ छोडा , तो जमीन पर ही गिरेगी ‘ अशी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. असे धनंजय मुंडे म्हणाले.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी शासन अधिकचा निधी कसा उभारणार आहे? अल्पसंख्याकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. बेरोजगार तरुणांना स्पर्धा परिक्षा देताना जीएसटी कर भरावा लागत आहे. तसेच निवडक व्यापा-यांच्या एलबीटी साठी ४१ हजार कोटी रुपयांचा भार राज्याने सहन केला आहे.

सिंचनाच्या अनुशेषाबाबत राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून सरकारच्या क्षमतेवर राज्यपालांचाही विश्वास राहिला नाही. सिंचनाबाबतीत सरकारचे दावे उघडे पडले आहेत. ३२ लाख हेक्टर सिंचन क्षेत्र आघाडीच्या काळात झाले आहे, हिंमत असेल तर सर्व आकडेवारी सभागृहासमोर ठेवा. असे आव्हान धनंजय मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांना केले.

अर्थसंकल्पात शेतीसाठी केवळ ५ % तरतूद केली आहे. कृषी क्षेत्राबाबत सरकारच्या वल्गना फोल ठरल्या आहेत. ९ महीन्यानंतर हि ४३ लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असून आत्महत्या केलेल्या शेतक-यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळत नाही. तसेच १०० योजना जाहीर केल्या तरी शेतक-यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत, असा प्रश्न सुद्धा धनंजय मुंडे यांनी सभागृहात उपस्थित केला.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १५ हजार कोटी तुटीचा अर्थसंकल्प मांडला असला तरी ही तूट प्रत्यक्षात ४० हजार कोटी पर्यंत जाणार आहे. राज्य कर्जबाजारी झाले असून सदर कर्ज शासन कसे फेडणार आहे. उत्पन्न वाढीची टक्केवारी घसरली आहे. उत्पन वाढीचे स्तोत्र सरकारच्या हातून निसटून जात आहेत. तसेच शेतीसाठी केवळ ५ % तरतूद केली आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राबाबत सरकारच्या वल्गना फोल ठरल्या आहेत. असे धनंजय मुंडे म्हणाले.Loading…


Loading…

Loading...