उत्तराखंडमध्ये ढगफुटी होऊन चार जण ठार, ११ जण बेपत्ता

देहरादून : उत्तरराखंडमधील मालपा येथे ढगफुटी झाल्याने चार जण ठार झाले. ढगफुटी होऊन आलेल्या पुरामुळे ११ जण बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये ७ सशस्त्र सीमा दलाच्या जवानांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कैलास मानसरोवर यात्रादेखील थांबविण्यात आली आहे. काली नदीमध्ये वाहून गेलेल्या नेपाळी महिलेची मदत करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अलागढ येथे रस्ता बंद झाला असून मांगतीमध्ये दोन पुल वाहून गेल आहेत. तसेच काली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शनिवारी हिमाचल प्रदेशमधील मंडीमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ४६ पोहोचली आहे