बिहार: पूरग्रस्तांच्या सहाय्यतेसाठी ‘एनडीआरएफ’ ची मदत

पूर्णिया: बिहारमधील पूरग्रस्त नागरिकांना राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि लष्कराच्या तुकड्या सहाय्य करत आहेत. ओडीसामधील भुवनेश्वर येथून राष्ट्रीय आपत्ती तपास निवारण दलाचे एक पथक पूर्णिया येथे पोहोचले असून या तुकडीमध्ये १६० जवानांचा समावेश आहे. पूर्णिया जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना आज अन्नधान्यांचा पुरवठा करण्यात येत असून राज्य सरकारकडून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सर्व साहित्य पूरग्रस्तांपर्यत पोहोचविण्यात येत आहे. तसेच ५० हजार अन्नधान्याची पाकिटे तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रदीप कुमार झा यांनी सांगितले.तसेच राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने हेल्पलाईन क्रमांकाचीही व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले.