#महापूर : राज्यातील निवडणुका पुढे ढकला आणि राष्ट्रपती राजवट लागू करा : कॉंग्रेस

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. या पूरग्रस्तांना राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत आहे.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांनी राज्यातील पूरस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. या पार्श्वभूमीवर ‘विधानसभेसह राज्यातील सर्व निवडणुका एक वर्षांसाठी पुढे ढकलून राष्ट्रपती राजवट लागू करावी’, अशी मागणी केली आहे. ‘पुरामुळे मोठ्या प्रमाणात प्राणहानी व वित्तहानी झालेली आहे. गेल्या काही वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशी हानी झालेली आहे’, असं विधान केले.

तसेच पुढे बोलताना रणजित देशमुख यांनी ‘पूरग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुका व पुनर्वसन एकाचवेळी शक्य नाही त्यामुळे निवडणुका एक वर्षांसाठी पुढे ढकला. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही पुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले असल्यामुळे’, त्यांनी ही मागणी केली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनीही सध्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीची गरज आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत विधानसभा निवडणूक न घेता ती पुढे ढकला आणि कोल्हापूर, सांगलीतील परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करा असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले होते.

महत्वाच्या बातम्या-