भारतातील ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘फ्लिपकार्ट’ विक्रीत !

टीम महाराष्ट्र देशा : ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेला अॅमेझॉनमध्ये काम करताना दोन भारतीय तरुण सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांना कल्पना सुचली की भारतात सुद्धा ई-कॉमर्स क्षेत्रात अशीच एखादी कंपनी असावी आणि यातूनच पुढे फ्लिपकार्टचा जन्म आणि विस्तार झाला. फ्लिपकार्टनं अॅमेझॉनला चांगली टक्कर दिली. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये फ्लिपकार्टचं महसुली उत्पन्न घटलं होतं. त्यामुळे ही कंपनी विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे.

रिटेल क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी असलेली वॉलमार्ट आज फ्लिपकार्ट कंपनी विकत घेणार आहे. तब्बल 15 बिलियन अमेरिकन डॉलर्समध्ये वॉलमार्टनं फ्लिपकार्ट विकत घेतलीय.

फ्लिपकार्टच्या खरेदीसाठी वॉलमार्टनं 15 बिलियन अमेरिकन डॉलर मोजले आहेत. फ्लिपकार्टच्या खरेदीत अॅमेझॉननंदेखील रस दाखवला होता. मात्र फ्लिपकार्टनं वॉलमार्टनं दिलेला प्रस्ताव स्वीकारला. फ्लिपकार्टमधील 75 ते 80 टक्के हिस्सा वॉलमार्ट खरेदी करणार आहे. यातून होणाऱ्या फायद्यावर फ्लिपकार्टला कर भरावा लागेल.