fbpx

“आता तुम्हाला योग्य जागा दाखवणार…कोल्हे ला पाडणार”

पुणे : “आता तुम्हाला योग्य जागा दाखवणार…कोल्हे ला पाडणार” अशा आशयाचे शिरुर मतदारसंघात भररस्त्यात फ्लेक्स लावल्याने एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या सागर डुंबरे नावाच्या कार्यकर्त्याने डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात हि फ्लेक्सबाजी केल्याचे फ्लेक्सवरून समजत आहे.

शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणारे डॉ. अमोल कोल्हे हे शिरुरमधून शिवसेनेचे खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात लोकसभा लढणार आहेत. २०१४ साली शिरूरमधून माजी आमदार विलास लांडे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात अपयश आले होते. यावेळीही त्यांना उमेदवारी मिळावी याकरिता त्यांचे कार्यकर्ते आग्रही होते.

स्वतःला तळतळीचा कार्यकर्ता म्हणून घेणाऱ्या सागर डुंबरे याने हि फ्लेक्स बाजी केली असून त्यात त्याने ”अमोल कोल्हे राष्ट्रवादीतून लढणार असतील तर, त्यांना आम्ही आमची ताकद दाखवणार, अडचणीच्या काळात राष्ट्रवादीला साथ देणाऱ्या लांडे यांना उमेदवारी न दिल्याने कोल्हे यांना पाडणार असे या फ्लेक्स मध्ये लिहिलेले आहे.

सध्या शिरुर मतदारसंघात या फ्लेक्स ची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.