राजकारण्यांनी डीएसकेंच्या विषयात हस्तक्षेप करू नये – फ्लैटधारक

डीएसके याप्रकरणामधुन बाहेर निघण्याची शक्यता नसल्याचा अंदाज तक्रारदारांनी केला व्यक्त

पुणे – काल राज ठाकरेनी गुंतवणूकदारांची पुण्यात भेट घेऊन डीएसके प्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता व डीएसकेंच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन देखील राज ठाकरे यांनी केले होते मात्र आज पुण्यातील डीएसकेंच्या तब्बल तेरा घरकुल साइट वरील फ्लैटधारक आज डीएसकें विरोधात तक्रार देण्यासाठी पुणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामध्ये आले होते. लवकरात लवकर आमचे फ्लैट्स पूर्ण करून द्यावेत त्याचबरोबर राजकारण्यांनी डीएसकेंच्या विषयात हस्तक्षेप करू नये अशी मागणी देखील तक्रारदारांनी केली आहे. डीएसके याप्रकरणामधुन बाहेर निघण्याची शक्यता नसल्याचा अंदाज तक्रारदारांनी व्यक्त केला.

You might also like
Comments
Loading...