‘या’ जागेसाठी विधानसभा निवडणुकीत झाली फिक्सिंग, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

Gram Panchayat election result: BJP claims dominance in Jintur taluka, while NCP claims dominance in Selut

लातूर : 2019 साली राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या. यावेळी लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेत फिक्सिंग झाली होती, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. या मतदारसंघात काँग्रेसला निवडून येण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून येथे जनसंपर्क नसलेल्या नेत्याला उमेदवारी दिली असे संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

लातूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, लातूर ग्रामीणची भाजपची जागा शिवसेनेला सोडण्यात आली. संवेदनशील असलो तरी राजकीय क्षेत्रात मजबुतीने पुढे जात आहोत. जे घडले ते खरे सांगतो, लातूर ग्रामीणची जागा फिक्स झाली होती. भाजपची जागा शिवसेनेला गेली होती. आम्ही घरी बसून निवडून आलो हाचा अविर्भाव फार छळत होता. शिवसेनेच्या या भूमिकेला मी तेव्हाही विरोध केला होता, असे संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

राजकीय क्षेत्रात काम करताना जनतेला गृहित धरून चालत नाही, जनता एक ना एक दिवस तुम्हाला नक्की जागा दाखवते. या विधानसभा मतदारसंघातील पराजय खूप वेदना देणारा होता. त्यामुळे यासाठी कारणीभूत असणाऱ्या प्रत्येकाला सोडणार नसल्याचा इशारा यावेळी आमदार निलंगेकर यांनी दिला. ते म्हणाले, शिवसेनेने येथे काँग्रेसच्या धीरज देशमुख विरोधात सचिन देशमुख यांना उमेदवारी दिली. मात्र, सचिन देशमुख यांचा प्रचार न झाल्याने धीरज देशमुख सहज विजयी झाले. सचिन यांच्यापेक्षा जास्त मते ‘नोटा’ला मिळाली.

महत्वाच्या बातम्या