सेंट्रल कंपोस्टींगसाठी जागा निश्चित

blank

औरंगाबाद : सोमवारी महापौर नंदकुमार घोड्ले माननीय जिल्हाअधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी सेंट्रल बसस्थानक , आकाशवाणी चौक , गजानन महाराज मंदिर चौक व पुंडलिक नगर आणि शहागंज य भागत कचऱ्याची पाहणी केली . आकाशवाणी भिंती लगत साचलेल्या कचऱ्याचे व शहागंज बसस्थानक आवारातील कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर बायोकल्चरची फवारणी करून जागेवरच सेंद्रिय खत तयार करावे. आणि रात्रपाळी मध्ये व्यापाऱ्यांकडून कचरा गोळा करावा तसेच पुंडलिक नगर मधील पाण्याच्या टाकीखालील कंपोस्टींग सेंटर चा सुका कचरा शिवाजी नगर येथे न्यावा व शिवाजी नगरचा ओला कचरा पुंडलिक नगरला आणून त्यावर प्रक्रिया करावी अशा सूचना आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिल्या.

तसेच यावेळी मांडकी बायपास रस्त्यावर जिल्हाअधिकारी यांनी दुग्धनगरी ला दिलेली 25 एकर गायरान जागा सेंट्रल कंपोस्टींगसाठी निश्चित केली .या प्लांटचा वापर कचऱ्यातून बायोगँस निर्मितीसाठी केला जाईल असे आयुक्त यावेळी म्हणाले.व्यापारी, फळविक्रेते व हॉटेल मालकांनी ओला कचरा डीव्हायडरमध्ये न टाकता मनपा कर्मचाऱ्यांना देऊन सहकार्य करावे असे महानगरपालिकेकडून अवाहन करण्यात आले.यावेळी उपमहापौर विजय ओताडे , स्थायी समिती सभापती गजानन बारवाला , अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग व घन कचरा व्यवस्थापण कक्ष प्रमुख विक्रम मांडूरके यांची उपस्थिती होती .