लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर पाच वर्ष अत्याचार

औरंगाबाद : अठाविस वर्षीय विवाहित महिलेस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना पैठण तालुक्यातील कडेठाण जवळील भासूनाईक तांडा येथे उघडकीस आली असून या प्रकरणी पाचोड ता.पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन रामेश्वर राठोड या एकवीस वर्षीय आरोपीस अटक करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की,पैठण तालुक्यातिल कडेठाण बु. येथील २८ वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना उघडीस आली असुन यासंदर्भात पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडेठाण लगत असलेल्या भासूनाईक तांडा येथील रामेश्वर विजय राठोड यांचे गावातील एका २८ वर्षीय विवाहित महिले सोबत पाच वर्षापासून अनैतिक संबध होते.

रामेश्वरने महिलेस लग्नाचे खोटे आमिष दाखवून दि.१६ जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सदर महिला ही तिच्या पतीसह दोन मुलांना सोडून रामेश्वर राठोड सोबत पळून गेली. तसेच त्याच रात्री चित्तेगाव येथे गेल्यानंतर त्याने तिच्या सोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. विवाहितेने रामेश्वर राठोड समोर लग्न करण्याचे गळ घातली. रामेश्वरने टाळाटाळ करण्यास सुरूवात केली आणि लग्नासाठी स्पष्ट नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याविवाहित महिलेने घरी परतून घडलेला सर्व प्रकार घरच्या समोर कथन करुन तिने नंतर पाचोड पोलिस ठाण्यात येऊन रामेश्वर राठोड यांने लग्नाचे आमिष दाखवून पाच वर्षापासून तिच्यावर अत्याचार केला असल्याची तक्रार पाचोड पोलीस ठाण्यात दिली.

महत्त्वाच्या बातम्या