जम्मू कश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चौगाममध्ये सुरक्षा दलाने पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. या भागात आणखी काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे. सध्या दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हिजबूल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबचे आहेत. दोन बँक कर्मचारी आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येत या दहशतवाद्यांचा हात असल्याचं सांगितलं जात आहे. दहशतवादी परिसरात लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी सुरक्षा यंत्रणाकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं होतं.

भारतीय जवानांचे मोठे यश, चार दहशतवाद्यांचा खात्मा

You might also like
Comments
Loading...