आठवीत शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनी दक्षिण मुंबईतून बेपत्ता

आठवीत शिकत असणाऱ्या पाच विद्यार्थिनी दक्षिण मुंबईतून शुक्रवार दुपारपासून बेपत्ता झाल्या आहेत. फोटोमधल्या या मुली शाळेतून घरी तर निघाल्या पण घरी पोहचल्या नाहीत. पोलीसानी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

शुक्रवारी शाळेचा ‘ओपन डे’ (निकालाचा दिवस) होता.  त्यामुळे या पाचही जणी शाळेत आल्या होत्या. तसेच चाचणी परीक्षेचा निकालही  जाहीर झाला होता. यामध्ये विद्यार्थिनींना कमी गुण मिळाले होते. या विद्यार्थिनी सायंकाळी ५ वाजता मरीन ड्राइव्हवर अखेरच्या दिसल्या होत्या. त्यानंतर त्यांना कोणी पाहिले नाही, अशी कुलाबा पोलिसांची माहिती आहे.

पोलिसांनी या पाचही जणींची फोटो सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तसेच संबंधित संस्थांकडे पाठवली आहेत. पालकांनी या मुली बेपत्ता झाल्याची फिर्याद कुलाबा पोलिसांत दाखल केली आहे.