पाच राज्यातील निवडणुकांचे उद्या निकाल, लोकसभेच्या सेमीफायनलकडे अवघ्या देशाचे लक्ष

टीम महाराष्ट्र देशा- मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे लोकसभेची सेमिफायनल म्हणून पाहिले जात असून, ११ डिसेंबर रोजी त्यांचे निकाल काय लागतात, त्यावर भाजपा व काँग्रेसचे भवितव्य अवलंबून असेल.

मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांत गेल्या निवडणुकांत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. छत्तीसगड व मध्य प्रदेश १५ वर्षे भाजपाकडे आहेत. हा भाग उत्तर भारतातील आहे. त्यामुळे हे निकाल उत्तर भारतातील मतदारांचाच कल सांगणारे असू शकतात. या पाचपैकी किमान दोन राज्ये तरी आपल्याला मिळावीत, असा काँग्रेसचा प्रयत्न होता. मध्य प्रदेश व राजस्थान ही दोन राज्ये भाजपाच्या हातातून निसटून काँग्रेसकडे आली, तर भाजपला हा मोठा धक्का असेल.

महाराष्ट्रासह अनेक राज्यात बांधकाम बंदी – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

4 Comments

Click here to post a comment