मुंडेंच्या परळी मतदार संघात पंचतारांकित एमआयडीसी, राज्य सरकारची मान्यता

बीड : भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेक राजकीय मंडळींचा जिल्हा अशी ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात विकासाच्या वाटा तशा अजूनही बऱ्याच दूर असल्याचे दिसते. राजकीय आखाड्यामुळे कायमच चर्चेत असलेल्या या जिल्ह्यातील परळी मतदार संघ मुंडे भावंडामुळे नेहमीच चर्चेत असतो. याच परळी मतदार संघात पंचतारांकित एमआयडीसी उभी करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलीय.

या संदर्भात धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिलीय. ते म्हणाले की, इथल्या युवकांना इथेच रोजगार मिळावा हे मी पाहिलेले एक स्वप्न आहे. निवडणुकीत हा दिलेला शब्द आहे. या पंचतारांकित एमआयडीसीचे स्वप्न आता सत्यात उतरण्यास सुरूवात झाली आहे. सरकारच्या वतीने परळी एमआयडीसीच्या प्रस्तावास अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. या मान्यतेबद्दल त्यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे आभारही मानले आहेत.

वास्तविक दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. रोजगाराच्या संधी नसल्याने या जिल्ह्यातील हजारो युवक औरंगाबादसह पुण्या-मुंबईकडे धाव घेत असतात. या युवकांना जिल्ह्यामध्येच रोजगार उपलब्ध झाल्यास जिल्ह्याचा विकास होण्यासही मदत होईल. मात्र, आता केवळ मान्यता मिळाली आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाल्यास त्याचा फायदा इथल्या स्थानिकांना नक्कीच होईल.

महत्त्वाच्या बातम्या 

IMP