मिटमिटा प्रकरणात पाच पोलिस दोषी

औरंगाबाद-  मिटमिटा प्रकरणात अडकलेल्या पोलिसांच्या अडचणीत आणखी भर पडली असून चौकशीत आणखी पाच पोलिस दोषी आढळले आहेत. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून या समितीने आतापर्यंत 50 जणांचे जबाब नोंदविले. जखमी पोलिस अधिकारी, कर्मचार्यांचे जबाब नोंदविणे बाकी असल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मागील महिनाभरापासून कचर्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, 7 मार्च रोजी मिटमिट्यातील सफारी पार्कच्या जागेवर कचरा टाकण्यासाठी जाणार्या मनपाच्या वाहनांना अडवून पडेगाव, मिटमिट्यात दगडफेक करण्यात आली होती. परंतु त्यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून मिटमिट्यात महिला, मुले, ज्येष्ठांना अमानुष मारहाण केली. घरांवर दगडफेक करीत नुकसान केले होते. या प्रकारामुळे मिटमिट्यात दहशत निर्माण झाली होती. तेव्हापासून कचर्याचा प्रश्न बाजूला पडून पोलिसांची चौकशी सुरू झाली. यातच आमदारांनी विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठविल्यामुळे थेट पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.

You might also like
Comments
Loading...