आजपासून लागू होणार बँकिंग संबधी हे नवीन नियम

sbi

नुकतेच स्टेट बँक ऑफ इंडियाने बँक खात्यात किमान रक्कम ठेवण्याच्या अटीमध्ये शिथीलता आणली आहे. यानंतर आजपासून बँकिंग व्यवहारा संबंधी पाच मोठे नियम बदलणार आहेत. तसेच देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर आजपासून इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सुरु करण्यात येणार आहे

एसबीआयकडून मिनिमम बॅलन्स मर्यादेत कपात

स्टेट बँक ऑफ इंडियाने मेट्रो शहरांमध्ये खात्यात मिनिमम रक्कम मर्यादा 5 हजारावरून 3 हजार रुपये केली आहे. तर पूर्वी मिनिमम रक्कम न ठेवल्यास 40 ते 100 रुपये दंड आकारला जात असे. हा दंड आता 50 रुपये करण्यात आला आहे. एसबीआयने पेन्शन धारक, सरकारी योजनांचे लाभार्थी आणि अल्पवयीन खातेधारकांना किमान रक्कम ठेवण्याच्या मर्यादेतून वगळल आहे.

Loading...

जुने चेक रद्द

नुकतेच काही बँकाचे एसबीआयमध्ये विलनीकरण करण्यात आले आहे. आता या बँकांचे चेक यापुढे अमान्य केले जाणार असून, या बँकांचे जुने चेक आणि आयएफएससी कोड 30 सप्टेंबरनंतर चालणार नाहीत.

जुने खाते बंद करण्यासाठी फी नाही

तुम्हाला जर तुमचे एसबीआयमधील खातं बंद करायचे असल्यास आता फी लागणार नाही. मात्र हे खाते एका वर्षापेक्षा अधिक जूने असणं गरजेचं आहे. तसेच नवीन खाते 14 दिवसानंतर किंव्हा एक वर्षाच्या आत बंद केल्यास 500 रुपये अधिक जीएसटी भरावा लागणार आहे.

 

कॉल रेट स्वस्त होण्याची शक्यता

ट्रायने नुकतच इंटरकनेक्शन चार्जचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. हा चार्ज 14 पैसे प्रती मिनिटांहून 6 पैसे प्रती मिनिट करण्यात आला आहे. त्यामुळे आता मोबाईल बिल आजपासून स्वस्त होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय महामार्गांवर ईटीसी

देशातील राष्ट्रीय महामार्गांवर आजपासून इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सुरु होणार आहे. त्यामुळे आता तुमच्या गाडीवर आरएफआयडी असल्यास टोलनाक्यावर थांबण्याची गरज नाही.