महाराष्ट्रात पाच नवी पासपोर्ट कार्यालये

पासपोर्ट

नागरिकांना पासपोर्ट सेवा सहज आणि सुलभपणे मिळावी या उद्देशाने महाराष्ट्रात आणखी पाच ठिकाणी पासपोर्ट कार्यालये सुरु केली जाणार आहेत.

अकोला, अमरावती, चंद्रपूर, बारामती, माढा या ठिकाणी नव्याने पासपोर्ट कार्यालय उघडली जाणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 27 पासपोर्ट कार्यालये असून, या नव्या पाच कार्यालयांची त्यात भर पडल्यानंतर ही संख्या 32 वर जाईल.