जालन्यातील तरुणीचा लग्नाच्या नावाखाली मालेगावच्या तरुणाला पाच लाखांचा गंडा

नाशिक : लग्न होण्यास अडचणी येणाऱ्या इच्छुक मुलांना हेरुन लग्न जमवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्यात. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील राजमाने येथील एका तरुणाला पाच लाखाचा गंडा घालणाऱ्या वधूसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, भाऊराव सुमराव या तरुणास शेरुळच्या शिवा रमेश भाट, जयसिंग रमेश भाट, अर्जून रामसिंग चव्हाण यांनी जालन्याच्या मुलीचे स्थळ सुचवले. यासाठी संतोष भिका सारंग (रा. पिंजारवाडा, ता. चाळीसगाव), संगीता लक्ष्मण म्हस्के (रा. जालना), आकाश पांडुरंग सोनवणे व विजय विराटे (रा. औरंगाबाद) यांनी मदत केली. लग्न जुळवण्यासाठी भाऊराव याच्याकडून पाच लाख घेऊन चित्रा अशोक चौधरी हिच्याशी लग्न लावून दिले.

दरम्यान, लग्नाच्या काही दिवसानंतर नवरी चित्रा हिने जालन्याला जाण्याचा हट्ट करत जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. त्यामुळे भाऊरावने संबंधितांना याची माहिती दिली. त्यांनी मुलीला एका हॉटेलवर घेऊन येण्यास सांगितले. ‘मुलीला सोबत घेऊन जातो, तुमचे पैसे नंतर देऊ’, असे सांगितले. भाऊरावने पैशांची मागणी केल्याने त्याला व सोबत असलेल्या साक्षीदारांना शिवीगाळ करत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने भाऊरावने तालुका पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात फिर्याद दाखल केली.

महत्त्वाच्या बातम्या

IMP