रिषभ पंतसह पाच भारतीय खेळाडू ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकित 

पंत

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) दरवर्षी विविध विभागात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देत असते. पण आता बुधवारी(27 जानेवारी) आयसीसीने ‘प्लेअर ऑफ द मंथ’ अर्थात महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू या नव्या पुरस्काराची घोषणा केली आहे. त्यामुळे आता प्रत्येक महिन्यात तिन्ही क्रिकेट प्रकारात चांगली कामगिरी करणाऱ्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूचा सन्मान केला जाणार आहे.

जानेवारी महिन्यासाठी भारताच्या आर अश्विन, रिषभ पंत, मोहम्मद सिराज, टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर या भारतीय खेळाडूंना नामांकन मिळाले आहे. या शिवाय जो रुट, स्टिव्ह स्मिथ, रहमानुल्लाह गुरबाज या खेळाडूंनाही नामांकन आहे. महिला क्रिकेटपटूंमध्ये मेरीझन कॅप, नॅडिन डी क्लार्क, निदा दार (पीएके) अशा खेळाडूंचा नामांकनात समावेश आहे.

नामांकन मिळालेल्या भारतीय खेळाडूंनी नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रभावशाली कामगिरी केली होती. त्यांनी दिलेल्या योगदानामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत 2-1 अशा फरकाने ऐतिहासिक विजय मिळवता आला होता. तर भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.

महत्वाच्या बातम्या