हटके जगमोहन रेड्डी, आंध्र प्रदेशात पाच उपमुख्यमंत्री

अमरावती : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाचा दारूण पराभव करणारे, आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता आंध्र प्रदेशला एक-दोन नाही तर पाच उपमुख्यमंत्री असनार आहेत.

दरम्यान, वायएसआर काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत जगनमोहन रेड्डी यांनी लोकांच्या अपेक्षा ध्यानात ठेवून मंत्र्यांची निवड करण्यात आल्याचे म्हटले. येत्या शनिवारी २५ मंत्र्यांचा शपथविधी पार पडनार आहे . अडीच वर्षानंतर कामगिरीच्या आधारावर मंत्रिमंडळात बदल केला जाईल, असेही यावेळी जगनमोहन रेड्डी यांनी सांगितले आहे. आपन वायएसआर काँग्रेस आणि यापूर्वीच्या सरकारमधील फरक जनतेला दाखवून देऊ असा अशावादही त्यांनी बोलून दाखवला.

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाच उपमुख्यमंत्री करण्यात आले आहेत. यापूर्वी चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारच्या काळात कापू आणि ओबीसी समाजातील प्रत्येकी एका आमदाराला उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते.जगमोहन रेड्डी यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय जाती, अल्पसंख्याक आणि कापू समाजातील प्रत्येकी एका आमदाराला उपमुख्यमंत्रीपद दिलेआहे